कोरोना अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:23+5:302021-07-10T04:22:23+5:30
२. गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाशी संलग्न सर्व कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी नुकतीच विशेष लसीकरण ...

कोरोना अपडेट
२. गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाशी संलग्न सर्व कंपन्यांमधील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांसाठी नुकतीच विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याचा लाभ ३४४ जणांनी घेतला. प्रकल्पातील मेडिकल सेंटरमध्ये ५ स्वतंत्र कक्षांमध्ये लस देण्याची व्यवस्था तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागावर कोणताही अतिरिक्त ताण न येता लसीचा एकही डोस वाया न जाता नियोजनबद्धरितीने हे लसीकरण पार पडले.
३. खेड तालुक्यातील वेरळ जांबुर्डे गावातील रहिवाशांना कोरोनापासून पुरवण्यात येणारी लस अत्यल्प प्रमाणात देण्यात येत आहे. त्यामुळे पुरेसी लस मिळावी, अशी मागणी ग्रुपग्रामपंचायत वेरळ जांबुर्डेतर्फे प्रशासन व संबंधित यंत्रणेकडे करण्यात आली आहे. वेरळ जांबुर्डे गावातील कोरोना लसीकरण हे प्राथमिक आरोग्य केंद्र, तिसंगी येथे होत आहे. ग्रुपग्रामपंचायत वेरळ जांबुर्डेची ३,६२८ लोकसंख्या असून, तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र हे वेरळ गावापासून १२ कि.मी. अंतरावर आहे.