कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST2021-07-04T04:21:15+5:302021-07-04T04:21:15+5:30

२. गावात करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृतिदल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली ...

Corona patient | कोरोना रुग्ण

कोरोना रुग्ण

२. गावात करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांची नावे ग्राम कृतिदल किंवा वाडी कृती दलाच्या प्रमुखांनाच कळविली जात नसल्याने गावांमध्ये या रुग्णांना विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे, तसेच अहवाल उशिरा येत असल्याने या गावांमध्ये अशा व्यक्तींपासून संसर्ग वाढण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व ग्रामपातळीवरील यंत्रणा यामध्ये समन्वय नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

३. खेड तालुक्यातील वडगाव शिवसेना शाखेच्या वतीने अठरा गावे विभागातील ग्रामस्थांना गंभीर आजाराच्या वेळी तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम, चंद्रकांत कदम यांच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा शाखाप्रमुख हरिश्चंद्र मोरे, दत्ताराम मोरे, रामाजी जाधव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Web Title: Corona patient