शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:00 IST

राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.

ठळक मुद्देकोरोना संकटाचा फटका यंदा वृक्ष लागवडीलाही, महत्त्वाकांक्षी योजनापन्नास कोटी रोपे लावण्याचे होते उद्दिष्ट, जिल्हा आघाडीवर, काम झाले ११६ टक्के

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी योजनेला जिल्ह्यासह राज्यात खीळ बसली आहे.तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यावरण जतन करण्यासाठी तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारने २०१६ साली ५० कोटी वृक्ष लागवडीची योजना जाहीर केली. यात पहिल्या वर्षी २०१६ - १७ या सालाकरिता राज्यासाठी एकाच दिवशी २ कोटीचे उद्दिष्ट होते.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ लाख ६४ हजार लागवडीचे उद्दिष्ट होते. १ ते ३१ जुलै या कालावधीत हे उद्दिष्ट ओलांडून पहिल्याच वर्षी जिल्ह्याने दोन लाख पाच हजार (१२४ टक्के) वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग आदी विविध यंत्रणांच्या सहाय्याने उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड करण्यात आली.सन २०१७ - १८ करिता राज्याला ४ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याला ३ लाखांचे उद्दिष्ट होेते. यावर्षीही जिल्ह्याने सर्व यंत्रणांच्या सहकार्याने उद्दिष्ट ओलांडून ३ लाख ८० हजार (१२६ टक्के) लागवड केली. २०१८ - १९ साली राज्याला १३ कोटींचे, तर जिल्ह्याला २० लाख ५४ हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यावेळीही जिल्ह्याने उद्दिष्ट ओलांडून २२ लाख ३७ हजार (१०९ टक्के) वृक्षलागवड केली.

२०१९ - २० साली राज्याच्या ३३ कोटी उद्दिष्टापैकी जिल्ह्याला ४८ लाख ६३ हजारांचे उद्दिष्ट असताना जिल्ह्याने ५७ कोटी ७२ लाखांचा (११८.६९ टक्के) टप्पा गाठला. शेवटच्या पाचव्या वर्षी राज्याने ५० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, यावर्षी कोरोना संकट फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.त्या जागा भरायला हव्यानिसर्ग चक्रीवादळात दापोली, मंडणगड, गुहागर येथे अनेक शासकीय जागेतील वृक्ष कोलमडून पडले आहेत. तसेच चौपदरीकरणाच्या कामामुळे मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गही ओसाड होऊ लागला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची योजना राबविताना तुटलेल्या झाडांच्या ठिकाणी लागवड करून ती झाडे जगवल्यास योजनेचे उद्दिष्ट साध्य होईल.यंदा पाचवे वर्ष२०१६ साली योजना सुरू होता पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी, तिसऱ्या वर्षी १३ कोटी, चौथ्या वर्षी ३३ कोटी आणि शेवटच्या पाचव्या वर्षी ५० कोटींचे उद्दिष्ट होते.रत्नागिरी जिल्ह्यात उद्दिष्टपूर्तीजिल्ह्याला पहिल्या वर्षी १ कोटी ६४ लाख, दुसऱ्या वर्षी ३ लाख, तिसऱ्या वर्षी २० लाख ५४ हजार, तर चौथ्या वर्षी ४८ लाख ६३ हजार असे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने एकूण ७३ लाख ८१ हजार एवढे उद्दिष्ट ओलांडून ८५ लाख ९४ (११६.४३ टक्के) वृक्ष लागवड केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग