ठेकेदार आत्महत्याप्रकरणी दोघेही शाखा अभियंते निलंबित

By Admin | Updated: June 5, 2014 00:43 IST2014-06-05T00:42:38+5:302014-06-05T00:43:13+5:30

अभियंता घस्ते यांचे समर्पण

The contractor suspended both the branch engineers for suicide | ठेकेदार आत्महत्याप्रकरणी दोघेही शाखा अभियंते निलंबित

ठेकेदार आत्महत्याप्रकरणी दोघेही शाखा अभियंते निलंबित

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पालघर येथील ठेकेदार आत्महत्या प्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. एन. आनंदे आणि मंडणगड पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. बी. घस्ते यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी निलंबित केले. दरम्यान, ठेकेदार नियाज पठाण आत्महत्याप्रकरणी टीकेचे लक्ष्य ठरलेले अभियंता आर. बी. घस्ते यांनी बुधवारी सकाळी मंडणगड पोलीस स्थानकात हजर होऊन स्वत:स पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांना चौकशीकरिता आवश्यक असणारे दुसरे अभियंता एस. एन. आनंदे मात्र अद्याप फरार आहेत. मंडणगड पंचायत समितीमधील अभियंत्यानी सत्तर लाखाची बिले थकवल्याने पालघर येथील ठेकेदार पठाण यांनी शनिवार आत्महत्या केली व मरण्यापूर्वी चिठी लिहिली होती. ‘माझ्या आत्महत्येस आनंदे व घस्ते कारणीभूत’ असल्याचे नमूद केले होते. अभियंत्यांनी माझी बिले थकवल्याने व बिले मंजूर करुन देण्यासाठी पैसे घेतल्याने मी आत्महत्या करीत असल्याचे पठाण यांनी या चिठीत म्हटले होते़ याप्रकरणी बुधवारी सकाळी घस्ते यांनी समर्पण केले. दरम्यान, घस्ते यांच्या समर्पणानंतर मंडणगड पोलिसांकडून त्यांना दापोली येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)पठाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी या दोन्ही अभियंत्यांनी कशा प्रकारे नाहक त्रास दिला, याबाबत त्यांनी एका चिठीमध्ये नमूद केले होते. भोळवली देवाचा डोंगर येथील शेड व बसण्याच्या जागेच्या कामासाठी मक्तेदार सरपंचांनी ठेकेदार नियाज पठाण यांना नेमले होते. या शेडच्या कामाचे मक्तेदार सरपंचाला २ लाख ४२ हजार २६८ रुपये रक्कम आणि ९१ हजार ७४० रुपये असे एकूण ३ लाख ३४ हजार ८ रुपये अदा करण्यात आले होते. उर्वरित ५९ हजार ७९६ रुपये अनामत रक्कम म्हणून बांधकाम विभागाने जमा करुन ठेवले होते. दरम्यान, बसण्याच्या जागेचा वाद असल्याने ते काम पूर्ण होऊ शकलेले नाही. आत्महत्येनंतर मंडणगडमधील जनतेमध्ये उद्रेक निर्माण झाला होता. त्यावेळी लोकांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. एन. आनंदे आणि मंडणगड पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. बी. घस्ते यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या दोन्ही शाखा अभियंत्यांवर ठेकेदाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हे दोन्ही शाखा अभियंते गेले तीन दिवस फरार होते. त्यांचा पोलीस कसून शोध घेत होते. मुख्य कार्यकारी अभियंता विजयकुमार काळम यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या दोन्ही विभागांचे कार्यकारी अभियंता यांना प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी मुख्य कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर केला. आनंदे व घस्ते या दोन्ही शाखा अभियंत्यांचा ठेकेदार आत्महत्या प्रकरणाच्या एसआरआयमध्ये नोंद असून, हे दोन्ही शाखा अभियंते पोलीस तपासादरम्यान फरार आणि आत्महत्या केलेल्या ठेकेदाराच्या कुटुंबीय व जनतेचा उद्रेक यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना आज निलंबित केल्याचे घोषित केले. (शहर वार्ताहर)

Web Title: The contractor suspended both the branch engineers for suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.