ठेकेदाराचे अडीच लाख २० मिनिटांत लुटले

By Admin | Updated: March 15, 2016 00:19 IST2016-03-14T22:47:16+5:302016-03-15T00:19:43+5:30

गाडीतून रक्कम लंपास : रत्नागिरी एमआयडीसीतील प्रकार

The contractor robbed in 2.5 million 20 minutes | ठेकेदाराचे अडीच लाख २० मिनिटांत लुटले

ठेकेदाराचे अडीच लाख २० मिनिटांत लुटले

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या येथील विभागीय व्यवस्थापकांच्या कार्यालयाशेजारी एका ठेकेदाराने उभ्या करून ठेवललेल्या गाडीची काच फोडून अज्ञाताने आतील रोख २ लाख ५१ हजार रुपये लंपास केले. आज सोमवारी दुपारी ४ ते ४.२० या अवघ्या २० मिनिटांच्या काळात ही घटना घडली. याप्रकरणी ठेकेदार कादर इस्माईल सय्यद (४४, रा. सोंडगेवाडी, ता. कणकवली) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे.
कोकण रेल्वे व अन्य शासकीय कामे करणारे ठेकेदार कादर सय्यद हे कामानिमित्ताने रत्नागिरीत आले होते. त्यांनी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील मारुती मंदिरजवळ फेडरल बॅँकेतून दोन लाख ५१ हजार रुपये काढले. हे पैसे त्यांनी छोट्या बॅगमध्ये ठेवले व ही बॅग त्यांच्या पोलो (एमएच०७ क्यू-४०९८) या गाडीच्या केबिनमधील डिकीत ठेवली होती. फेडरल बॅँक शाखेकडून सय्यद हे नंतर एका सहकाऱ्यासह गाडीने एमआयडीसीतील (पान ८ वर)

गाडीवर सापडले ठसे
काचा फोडून अडीच लाख रुपये लंपास केलेल्या पोलो गाडीवर अज्ञाताच्या बोटांचे ठसे आढळले आहेत. हे ठसे अधिक तपासासाठी ठसे तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच ज्या मार्गाने सय्यद यांची गाडी रेल्वे कार्यालयाकडे गेली त्यामार्गालगत असलेल्या कंपन्यांच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणी संशयित आढळून येतात का? याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश थिटे यांनी दिली.

Web Title: The contractor robbed in 2.5 million 20 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.