कोकंबा आळीतील विहिरीचे पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:13+5:302021-04-10T04:31:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित झाले ...

कोकंबा आळीतील विहिरीचे पाणी दूषित
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : शहरातील गटाराचे पाणी विहिरीत उतरत असल्याने पाच ते सहा घराच्या विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे १२ ते १५ कुटुंबीयांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुटुंबीयांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गटारातील गाळ काढून गटार खोलीकरण करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, साेमवारपर्यंत पाण्याचा निचरा न केल्यास आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मनेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुकाध्यक्ष नितीन साठी, शहराध्यक्ष साईराज देसाई यांनी आक्रमक भूमिक मांडली आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दापोली शहरातील समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाले असून शहरातील विविध विकासाबाबत ते आग्रही आहेत. कोकंबा आळीतील सहा ते सात कुटुंबीयांच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी प्रश्न लवकर निकाली काढा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा सचिन गायकवाड यांनी दिला आहे.