Container river collapses, driver missing | कंटेनर नदीत कोसळला, चालक बेपत्ता
कंटेनर नदीत कोसळला, चालक बेपत्ता

संगमेश्वर (रत्नागिरी) : मुंबई -गोवा महामार्गावर शास्त्री पुलावरून कंटेनर नदीत कोसळून चालक बेपत्ता झाला आहे. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा कंटेनर  मुंबईकडून गोव्याकडे जात होता. वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर शास्त्री पुलावरून नदीत कोसळला. कंटेनरचा चालक बेपत्ता झाला आहे.
या अपघात माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दखल झाले. दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसामुळे नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्याही परिस्थितीत त्या चालकाचा शोध सुरू आहे. प्रत्येक दुर्घटनेत मदतीसाठी धाव घेणाऱ्या देवरुखच्या राजू काकडे टीमचे सदस्य, पोलीस व स्थानिक ग्रामस्थ चालकाचा शाेध घेत आहेत.


Web Title: Container river collapses, driver missing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.