शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'नैसर्गिक आपत्तीतही ग्राहकांना सुरळीत वीज मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:04 IST

'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे.

रत्नागिरी : चक्रीवादळे, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळीही भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण २ अंतर्गत रत्नागिरी शहरामध्ये ११ के.व्ही. कर्ला उच्चदाब उपरी विद्युत वाहिनी मार्गाचे भूमिगत विद्युत वाहिनीत रूपांतरण कामाच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यात ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते.यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता विजय भटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई उपस्थित होते.ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना समुद्र किनारपट्टीच्या भागात खाऱ्या हवामानामुळे वीज वाहिन्या गंजतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे अशा घटना घडतात. वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होतो. भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे या भागातील महावितरणचेही नुकसान टळेल व वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम गतीने करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. आपत्तीप्रसंगी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाचे ऊर्जामंत्री राऊत यांनी कौतुकही केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Rautनितीन राऊतelectricityवीज