रत्नागिरीकरांना दिलासा; काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:26+5:302021-05-05T04:51:26+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ...

Consolation to Ratnagirikar; Decrease in the number of patients with caries | रत्नागिरीकरांना दिलासा; काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट

रत्नागिरीकरांना दिलासा; काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांची एकूण संख्या २३,६२६ झाली आहे, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबाधित मृतांची संख्या ६९८ झाली आहे. ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण १६,३९१ रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी रत्नागिरी तालुक्यात संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात अँटिजेन चाचणीमध्ये १२५ रुग्ण, तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये १९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त १८६ रुग्ण असून, मंडणगड तालुक्यात दिवसभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दापोलीत २१, खेडमध्ये ४, गुहागरात १५, चिपळुणात १९, संगमेश्वरमध्ये ४३, लांजात २० आणि राजापूरमध्ये १६ रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १५.२९ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी मृतांची जास्त वाढत चालली आहे. रत्नागिरी तालुक्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून संगमेश्वर, लांजामध्ये प्रत्येकी ४, चिपळूणात २ आणि खेड, राजापुरातील एका मृताचा समावेश आहे. यामध्ये पन्नाशीच्या वयोगटातील ५ आणि ३० वर्षे वयोगटातील एक रुग्ण आहे. ५ महिला आणि १२ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृतांचे प्रमाण २.९५ टक्के असून, रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ६९.३७ टक्के आहे.

Web Title: Consolation to Ratnagirikar; Decrease in the number of patients with caries