शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

LokSabha2024: गणपतीपुळ्यातील मतदान केंद्रावर निसर्ग रक्षणाचा देखावा

By शोभना कांबळे | Updated: May 7, 2024 16:34 IST

‘प्राचीन कोकण म्युझियम’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून अनोखा संदेश

रत्नागिरी : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच मतदान जेवढे महत्वाचे तेवढेच निसर्ग रक्षणही महत्वाचे आहे ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी, या जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत  प्राचीन कोकण म्युझियमच्या माध्यमातून  'मतदानाप्रमाणे निसर्गरक्षण महत्वाचे' असा संदेश देणारा अनोखा देखावा साकारण्यात आला आहे. हे मतदान केंद्र विशेष आकर्षण ठरले आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज, मंगळवारी पार पडत आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी  एम देवेंदर सिंह यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, तेवढेच निसर्ग रक्षणही महत्वाचे आहे, ही संकल्पना मतदारांपर्यंत पोहोचायला हवी, असे मत मांडले. ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी या पर्यावरण केंद्राच्या उभारणीकरीता रत्नागिरीतील गणपतीपुळ्याच्या प्रसिद्ध प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक वैभव सरदेसाई यांच्याकडे यासंदर्भात देखावा तयार करण्याची विनंती केली होती. गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण हे म्युझियम हे गेली २० वर्षे निसर्ग रक्षणाचेच कार्य करत आहे. त्यासाठी त्यांनी नियोजन करून आपल्या कल्पनेतून या शाळेत विविध रुपात पर्यावरणाशी निगडीत गोष्टींचा समावेश करून निसर्ग पर्यटन केंद्र साकारले. कोकणचा समृद्ध निसर्ग दाखवणारा देखावा मतदारांसाठी तयार केला. कोकणामध्ये सर्व साधारणपणे आढळणारे बिबटे, ब्लॅक पँथर, हरीण, आदींचा  समावेश या दृश्यात करण्यात आला. समृध्द जलाशय त्यामागचे हिरवेगार जंगल आणि त्या जंगलासमोर विहारणारे जंगलातील विविध जंगली प्राणी हे एकोप्याने या दृष्यामध्ये नांदताना दिसले.  पाणवठा एक आहे पण जंगलातील सगळे प्राणी त्या ठिकाणी एकत्र येऊन सहजीवन अनुभवत आहेत अशी संकल्पना तयार केली.तसेच या ठिकाणी  सेल्फी पॉइंटही तयार केला. त्यामध्ये कोकणामध्ये आढळणारी कासवे, खवल्या मांजर, दुर्मिळ होत चालणारे ग्रेट इंडियन हॉर्नबिल म्हणजेच धनेश पक्षी आणि बिबट्या या सगळ्यांबरोबरचे सहजीवन आपण जगलो तरच कोकणचा समृध्द निसर्ग टिकून राहिल आणि तो टिकविण्यासाठी झाडे वाचवायला हवीत असा संदेश या दृष्यातून देण्याचा प्रयत्न केला. गणपतीपुळेत या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राचीन कोकण म्युझियमचे संचालक  वैभव सरदेसाई यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि उपविभागीय अधिकारी  जीवन देसाई यांनी संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान