शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महाआघाडीतून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर; उद्धवसेनेने फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:32 IST

Local Body Election: उद्धवसेनेचे नेते बाळ माने बोलतात एक व करतात दुसरे

रत्नागिरी : रत्नागिरीमध्येमहाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांनी एकत्र येऊन घेतला होता. मात्र, उद्धवसेनेचे नेते बाळ माने बोलतात एक व करतात दुसरे. काँग्रेसला सोडलेल्या जागांवरही त्यांनी उद्धवसेनेचे उमेदवार उभे केले. या फसवणुकीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाआघाडीतून बाहेर पडत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शुक्रवारी (दि. १९) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी आक्रमक भूमिका घेत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.उद्धवसेनेचे बाळ माने पहिल्या दिवसापासून आमच्या संपर्कात होते. आम्ही सर्वांनी एकत्रित बसून चर्चा केली आणि सामंजस्याने जागा वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला अतिशय कमी प्रमाणात जागा मिळाल्या. त्याही आम्ही सामंजस्याने स्वीकारल्या. आम्ही आमच्या उमेदवारांचे एबी फॉर्म भरले. मात्र तेव्हा बाळ माने यांनी आम्हाला दिलेल्या जागांसमोर उद्धवसेनेचे उमेदवार उभे केले असल्याचे समजले. याबाबत विचारणा केली असता, दि. २१ रोजी आपले उमेदवार अर्ज मागे घेतील, असे माने यांनी सांगितले. आघाडी म्हणून त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत माघार घेतली नाही. गुरुवारपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुदा व्यस्त असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही. या फसवणुकीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडीतून बाहेर पडत असल्याचे रमेश कीर व मिलिंद कीर यांनी जाहीर केले. आम्ही दोन काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढवू आणि आमच्या उमेदवारांवर लक्ष केंद्रित करू, असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress, NCP Exit Ratnagiri Alliance, Accuse Shiv Sena (UBT) of Deceit

Web Summary : Congress and NCP (Sharad Pawar) exited Ratnagiri's Maha Vikas Aghadi alliance, alleging Shiv Sena (UBT) betrayed them by fielding candidates against agreed-upon seats. They will contest independently.