गडनदी धरण पूर्ण भरले; सतर्कतेच्या सूचना
By Admin | Updated: July 15, 2017 14:32 IST2017-07-15T14:32:12+5:302017-07-15T14:32:12+5:30
सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला

गडनदी धरण पूर्ण भरले; सतर्कतेच्या सूचना
आॅनलाईन लोकमत
देवरुख (जि. रत्नागिरी), दि. १५ : संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात सध्या ६४ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने धोका वाढला आहे. गडनदी धरण भरून वाहू लागल्याने पाटबंधारे विभागाने नदीकिनारच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.
पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वांत मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहात आहे. धरणा पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीसाठा सांडव्याद्वारे नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाल्याने स्थानिकामध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे, तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरू नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात उतरण्याचा प्रयत्न करु नये. नागपूर येथील बोट दुर्घटना लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गोडबोले यांनी केले आहे.