९५ टक्के शिधापत्रिका संगणकीकृत
By Admin | Updated: July 1, 2015 00:36 IST2015-07-01T00:36:02+5:302015-07-01T00:36:02+5:30
काळाबाजार रोखण्यास मदत होणार : २ लाख २0 हजार ८२५ शिधापत्रिका धारकांचा समावेश--लोकमत विशेष

९५ टक्के शिधापत्रिका संगणकीकृत
गिरीश परब -सिंधुदुर्गनगरी -रेशनवरील अन्नधान्य, रॉकेल याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणीकृत करण्याचे ठरविले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिधापत्रिका संगणीकरण करण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून तब्बल २ लाख २० हजार ८२५ शिधापत्रिका संगणकीकृत झाल्या आहेत.
गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी सरकारने रास्त दरात अन्नधान्य, रॉकेल, गॅस देण्याची व्यवस्था केली आहे. तिचा फायदा सधन मंडळी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी रेशनवर अन्नधान्य, रॉकेल यांचा काळाबाजार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. पात्र व्यक्तींना पुरेसे धान्य मिळत नाही. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचे काम गेली २ वर्षे सुरु आहे. जिल्ह्यात २ लाख ३२ हजार ६९२ विविध प्रकारातील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी २ लाख २० हजार ८२५ शिधापत्रिका या संगणीकृत झाल्या आहेत. तर उर्वरित ११ हजार ८६७ शिधापत्रिका बाकी असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
आॅनलाईनला किती कालावधी जाणार
शिधापत्रिकांचे संगणकीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे त्याचबरोबर आधारकार्ड लिंकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर शिधापत्रिका या आॅनलाईन होणार आहेत. या प्रक्रियेस सुमारे सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील संगणकीकृत झालेले शिधापत्रिकाधारक
तालुकाएकूण शिधापत्रिकासंगणकीकृत झालेल्या शिधापत्रिका
वैभववाडी१३०६९१३०६९
देवगड३०४७७२८९११
कणकवली३८२५४३७८०८
मालवण३३६६९३०५९१
कुडाळ४१२९५३६२९५
सावंतवाडी४०२२४३८७०२
वेंगुर्ला२३४८९२३४८९
दोडामार्ग१२२१५११९६०
एकूण२३२६९२२२०८२५