संगणक शिक्षण विजेअभावी रखडले
By Admin | Updated: October 4, 2014 23:34 IST2014-10-04T23:34:45+5:302014-10-04T23:34:45+5:30
वीजबिले थकली : जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष?

संगणक शिक्षण विजेअभावी रखडले
श्रीकांत चाळके ल्ल खेड
हायटेक शिक्षणाची कास धरून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये संगणक उपलध करून देण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. प्राथमिक पुस्तकी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तंत्रशिक्षणाची भर भर पडावी हा यामागचा हेतू आहे. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील १३३ प्राथमिक शाळांनी विजेची बिले न भरल्यामुळे त्या शाळांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
खेड तालुक्यातील ८५ शाळांना याचा फटका बसला आहे. या शाळांमधील संगणक पडून आहेत. त्यामुळे हायटेक शिक्षणापासून शेकडो विद्यार्थी वंचित राहिले आहेत. खेड तालुक्यात ३७९ प्राथमिक शाळा आहेत. त्यातील ८५ शाळांमधील वीजजोडण्या तोडण्यात आल्या ्आहेत. सर्व शिक्षा अभियानामधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचा निर्णय झाला. शासनाच्या ४ टक्के सादील योजनेमधून शाळांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. परंतु हा निधीच मिळाला नाही. वीज बिलांना वाणिज्य दर आकारला गेला. त्यामुळे वीज बिलांमध्ये भर पडली व ती भरली गेली नसल्याने वीज खंडित झाली व त्यामुळे वीज प्रवाहाअभावी संगणक शिक्षण अडचणीत आले आहे.
जिल्ह्यात २४४६ शाळा असून त्यापैकी १३३ प्राथमिक शाळांमधील वीजजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याकडे लक्ष दत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. साळांमध्ये आकारण्यात येणारी बिले वाणिज्य आकाराने न लावता घरगुती दराने आकारावीत, यासाठी या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील वर्षी असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा याबाबत बोलणी सुरू असल्याचा थातुरमातुर खुलासा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात याकडे कोणी लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
खेड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता आर. व्ही. कदम यांनी ही विजेची कनेक्शने वाणिज्य दराने आकारण्यात आली असल्याची माहिती देत याबाबत आपल्या हातात काही नाही असे त्यांनी सांगितले. याबाबत वीज नियामक आयोगच मार्ग काढू शकतो, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.