देवणे पुलाचे उर्वरित काम तत्काळ पूर्ण करा : याेगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:31+5:302021-09-13T04:30:31+5:30
खेड : खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या जगबुडी नदीवरील देवणे पुलाच्या रस्त्यावरील डांबरीकरण पहिल्या पावसातच पूर्णपणे उखडून गेले. या पुलाची आमदार ...

देवणे पुलाचे उर्वरित काम तत्काळ पूर्ण करा : याेगेश कदम
खेड : खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या जगबुडी नदीवरील देवणे पुलाच्या रस्त्यावरील डांबरीकरण पहिल्या पावसातच पूर्णपणे उखडून गेले. या पुलाची आमदार योगेश कदम यांनी पाहणी करून अर्धवट राहिलेले पुलाचे काम तातडीने पू्र्ण करण्याचे आदेश आमदार याेगेश कदम यांनी दिले आहेत.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील सुमारे २० ते २५ गावांना जोडणारा देवणे पूल आहे. जगबुडी नदीवरील या पुलामुळे खाडीपट्ट्यात जाण्याचे अंतर सुमारे ५ किलोमीटरने कमी झाले आहे. खाडीपट्टा परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार २०१६ मध्ये या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. माजी मंत्री रामदास कदम यांनी या पुलासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पुलाच्या कामाला निधी उपलब्ध झाल्यावर काम सुरू करण्यात आले. १०० मीटर लांबी असलेल्या या पुलाचे काम ठेकेदार कंपनीने सप्टेंबर २०१९ अखेर पूर्ण करायचे होते. मात्र, अद्यापही हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान पुलावर केलेले डांबरीकरण वाहून गेले आहे. तर नगरपालिका हद्दीत येणारा पुलाचा जोडरस्ताही खचला आहे. या पुलाच्या कामाची आमदार याेगेश कदम यांनी पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम व खेड नगरपालिकेचे अधिकारी व पालिकेचे नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.