राजापुरातील अनधिकृत बांधकामाबद्दल मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:53+5:302021-03-22T04:27:53+5:30
राजापूरः शहरातील छत्रपती शिवाजीपथ मार्गावर तात्पुरत्या छप्पराची परवानगी घेऊन लोखंडी चॅनलवर स्लॅब ओतून करण्यात आलेल्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी ...

राजापुरातील अनधिकृत बांधकामाबद्दल मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार
राजापूरः शहरातील छत्रपती शिवाजीपथ मार्गावर तात्पुरत्या छप्पराची परवानगी घेऊन लोखंडी चॅनलवर स्लॅब ओतून करण्यात आलेल्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक अनिल कुडाळी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. या बांधकामाच्या जागेची बिनशेती परवानगी असल्यास त्याबाबतही माहिती मिळावी, असे कुडाळी यांनी तक्रार म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी पथ मार्गावर जमातुल मुस्लीम अध्यक्ष मधीलवाडा राजापूर यांचे नावे जागा आहे. या जागेत तात्पुरते छप्पर काढण्यास १७ जानेवारी २०१६ रोजी मे २०१६ अखेरपर्यंत परवानगी देण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम असलेली जागा ही शहराच्या सुधारित विकास आराखड्याप्रमाणे रस्ता रुंदीकरण, सामासिक अंतर व पूररेषेने बाधित होत असल्याने व मुदतीनंतर तात्पुरते छप्पर काढून टाकलेले नाही. त्यामुळे २८ सप्टेंबर २०१६ रोजी नगर परिषदेने नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये छप्परपट्टी ५,८२४ रूपये भरण्याबाबतही कळवण्यात आलेले होते. त्यानंतरही वारंवार नोटीस बजावून संबंधित अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आलेले नाही. याकडे कुडाळी यांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे.