शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:31 IST

highway, road, land, ratnagirinews रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.

ठळक मुद्देमिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांनाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उर्वरित गावांचा अद्याप विसर

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांच्या मोबदला निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.दोन्ही तालुक्यातील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे २०१७ साली पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव आणि ओझरे या दोन गावांमधील खातेदारांसाठी ६ कोटी ६३ कोटी एवढ्या मोबदल्याची रक्कम मार्च महिन्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू आहे.मुळात तीन वर्षानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून, केवळ आठ गावांच्या निवाड्याचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित १९ गावांना अजूनही मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या भूधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ आठ गावांचा निधी तीन वर्षानंतर आला. उर्वरित गावांच्या मोबदला रकमेसाठी प्राधिकरण अजून किती काळ प्रतीक्षा करायला लावणार, अशी प्रतिक्रिया या खातेदारांकडून व्यक्त होत आहे.रक्कम प्रशासनाकडेआतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार इतकी मोबदल्याची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील केवळ साखरपा आणि ओझरे या दोन गावांसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये एवढीच रक्कम प्रशासनाला देण्यात आली आहे.रत्नागिरी, संगमेश्वरातील जमिनी संपादितसंगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फ देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांमधील तसेच रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १४ गावांमधील जमीन संपादित केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी