शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

गतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याने घसरली, सिंधुदुर्गातील हापूस अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 1:44 PM

वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याने घसरली, सिंधुदुर्गातील हापूस अधिकदर मात्र घसरलेलेच : वाशीत दिवसाला सात हजार पेट्यांची आवक

रत्नागिरी : वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे.फेब्रुवारीपासून आंब्याची आवक किरकोळ स्वरूपात सुरू झाली आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज पाच ते सात हजार पेट्या विक्रीला जात आहेत. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. २००० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. शेतकरी सहा ते चार डझनच्या आंबा पेट्या भरून पाठवित असून, पेटीमागे मिळणाऱ्या दरात मात्र हजार रूपयांचा फरक पडत आहे. आतापर्यंत खत व्यवस्थापनापासून कीटकनाशक फवारणीपर्यंत केलेला खर्च विचारात घेता पेटीला मिळणारा दर फारच कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा कमी आहे. मात्र, दर सारखेच आहेत. वास्तविक दर वाढण्याची आवश्यकता आहे.थ्रीप्स, तुडतुड्याबरोबर बदलत्या हवामानामुळे कीडरोगाचा परिणाम झाला. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही घेतलेल्या कडक निर्बंधांमुळे शेतकरी बांधवांना खबरदारी घ्यावी लागली.होळीनंतर आंबा बाजारपेठेत वाढेल. मात्र, यावर्षी मे महिन्यात आंबा कमी असण्याची शक्यता आहे.

हवामानात बदल होऊ लागला असून, उष्णता वाढत आहे. त्यामुळे दि. १५ मार्चनंतर येणारा आंबा नक्कीच चांगला, मधुर चवीचा असणार आहे. शिवाय आवकही त्यावेळी वाढेल. होळीनंतर उत्तरप्रदेशातील लोक मुंबईत दाखल होतात. मुंबई उपनगरात विक्री मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आवक वाढली तरी दर बऱ्यापैकी स्थिर राहण्याची शक्यता आहे. हापूसने उशिरा का होईना, दिमाखात आगमन केल्याने खवैय्ये सुखावले आहेत. 

यावर्षी शेतकऱ्यांना थ्रीप्ससारख्या संकटाचा सामना करावा लागला आहे. थंडीमुळे फुलोरा झाला. परंतु त्या तुलनेत फळधारणा झाली नाही. शिवाय थ्रीप्स आटोक्यात न आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा कमी असताना दर चांगले असणे अपेक्षित आहे. महागाई ज्या पटीने वाढत आहे, त्यापटीत दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दर स्थिर राहणे गरजेचे आहे.- राजन कदम,बागायतदार, शीळ-मजगाव.कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली असली तरी प्रमाण कमी आहे. २५ मार्चनंतर प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकणाबरोबर कर्नाटक हापूस, बदामी, तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण निम्मे असतानाही दर मात्र सारखेच आहेत. आवक आंब्यापैकी ६० टक्के आंबा आखाती प्रदेशात निर्यात होत आहे. उर्वरित ४० टक्के आंबा मुंबई उपनगरातून विकला जात आहे. होळीनंतर आंब्याची आवक वाढेल.- संजय पानसरे,संचालक, बाजार समिती, वाशी.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी