शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:10+5:302021-07-10T04:22:10+5:30
प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष अर्ज छाननी (P-Scrutiny) निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे (मूळ व छायांकित प्रत) घेऊन प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर ...

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशाला प्रारंभ
प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष अर्ज छाननी (P-Scrutiny) निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे (मूळ व छायांकित प्रत) घेऊन प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर (FC) सर्व कोविड-१९ निर्बंधाचे पालन करत सुरक्षित अंतर पाळून अर्जाची छाननी करून घ्यावयाची आहे. तसेच E-Scrutiny (Online Scrutiny) हा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रावर (FC) जाण्याची आवश्यकता नाही.
..........
यावर्षीपासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकाट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा तीन वर्षांचा नवीन अभ्यासक्रम ६० प्रवेश क्षमतेसह सुरु होत आहे. महाराष्ट्रात ५ ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरु असून, रत्नागिरी राज्यातील दुसरे शासकीय तंत्रनिकेतन आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य औ. म. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या www.gpratnagiri.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.