आगवेत एस. टी. घसरुन १६ प्रवासी जखमी

By Admin | Updated: September 21, 2014 00:51 IST2014-09-21T00:51:51+5:302014-09-21T00:51:51+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळील घडला

Come to S. T. 16 people were injured in the accident | आगवेत एस. टी. घसरुन १६ प्रवासी जखमी

आगवेत एस. टी. घसरुन १६ प्रवासी जखमी

सावर्डे/चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डेजवळील आगवे गावी भरधाव वेगाने जाणारी पुणे-देवरुख गाडी घसरुन अपघात झाला. या अपघातात १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी पहाटे ४.३० नंतर घडला.
मुंबई-गोवा महामार्गावर देवरुख आगाराची पुणे-देवरुख ही गाडी (एम एच १४ बीटी २९९४) नेहमीप्रमाणे देवरुखकडे जात असता आगवे येथील पॅसिफिक हॉटेलजवळ चालकाला डुलकी आल्याने व गाडी भरधाव वेगाने असल्याने रस्त्याच्याविरुद्ध बाजूला ४० फुटापेक्षा जास्त खोल दरीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात एस. टी. बसचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. एस. टी.ने २ ते ३ वेळा उलटल्याने प्रवासी जखमी झाले. १६ प्रवाशांना डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जयश्री रामचंद्र झोरे (२९ नायरी), गंगाराम नारायण पांचाळ (७२, कोसुंब), सुनिता गंगाराम पांचाळ (६२, कोसुंब), धोंडू तुकाराम सावंत (६५, पाचांबे), यशोदा विजय नरोटे (४८, साडवली), शामल सुरेश पिंगळे (३८, पडवे), कमलाकर अनंत पांचाळ (४५, माखजन), प्रदीप सीताराम घडशी (२८, आंबेड), सविता प्रदीप कदम (३५, अंत्रवली), मानव प्रदीप कदम (९, अंत्रवली), नसरीन उस्मान खान (३३), उजमा उस्मान खान (२०), अफरीन तन्वीर मुल्लाजी (२० तिघेही शास्त्रीपूल संगमेश्वर), जनाबाई शांताराम बोडेकर (६५, देवरुख), एस.टी.चालक राजेंद्र बाळ हवालदार (४१), वाहक सचिन रामचंद्र मगदूम (३३ दोघेही देवरुख आगार) यांच्यावर वालावलकर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले. दुपारपर्यंत ४ जखमी प्रवासी घरी गेले. उर्वरित प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अपघात झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मदतीला दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. एस. टी. महामंडळाच्यावतीने चिपळूण आगारप्रमुख एस. बी. सय्यद व स्थानकप्रमुख राजेश पाथरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व जखमींना तातडीची मदत दिली. शिवाय औषधोपचाराचा सर्व खर्च एस.टी. महामंडळच करणार आहे. चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Come to S. T. 16 people were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.