पुढच्या वर्षी लवकर या!

By Admin | Updated: September 21, 2015 23:46 IST2015-09-21T21:16:18+5:302015-09-21T23:46:11+5:30

विसर्जन थाटात : पाच दिवसांच्या बाप्पांना श्रद्धापूर्ण निरोप

Come on next year! | पुढच्या वर्षी लवकर या!

पुढच्या वर्षी लवकर या!

रत्नागिरी : ‘पायी हळूहळू चाला मुखाने मोरया बोला’, ‘एक दोन तीन चार गणपतीबाप्पांचा जयजयकार’, ‘गणपतीबाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या’ अशी गणपतीबाप्पांकडे प्रार्थना करीत भाविकांनी गौरीगणपतींचे विसर्जन केले. गेले पाच दिवस उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज विसर्जनानंतर सांगता झाली.भाद्रपद चतुर्थीला जिल्ह्यात एक लाख ६५ हजार ८६ घरगुती तर १०७ सार्वजनिक गणेशमूर्तीची मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशचतुर्थीनंतर दीड दिवसांचे २ सार्वजनिक व ९९८० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते. पाचव्या दिवशी जिल्ह्यातील १६ सार्वजनिक व एक लाख ४ हजार ३६४ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. ढोल ताशे, बेंजो, झांजपथक, लेझीमपथकांत, गुलालाची उधळण करीत गणेश विसर्जनाच्या मिरवणूका काढण्यात आल्या. सायंकाळी आरती झालेनंतर डोक्यावरून हातगाडी, रिक्षा, चारचाकी गाडीतून गणेशमूर्ती विसर्जन स्थळाकडे नेण्यात येत होत्या. वाद्यांना फाटा देत काही मंडळी चक्क भजन म्हणत मूर्ती विसर्जनासाठी नेत होते. गणपती प्रतिष्ठापनेपासून घरोघरी चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण होते. गणपती विसर्जनासाठी नेताना भाविक भावूक झाले होते. त्यामुळेच बाप्पांना लवकर येण्याचे साकडे घालीत गणपतीबरोबर गौरीचे देखील विसर्जन करण्यात आले. गौरी गणपतीबरोबर पाच दिवसातील पूजेचे निर्माल्य भाविकांनी आणले होते. नगरपालिकेच्या कुंडात तसेच भारतीय पर्यावरण शास्त्र तंत्रज्ञान संस्थेने ठेवलेल्या ट्रकमध्ये टाकण्यात येत होते. भारतीय पर्यावरण शास्त्र तंत्रज्ञान संस्थेचे डॉ.श्रीरंग कद्रेकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शिरगाव मत्स्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यार्थी निर्माल्य संकलन करीत होते. काही भाविक चक्क पाण्यात सोडत होते. त्यामुळे लाटेबरोबर किनाऱ्यावर आलेले निर्माल्य भाविकांच्या पायाखाली येत होते. तर काही विद्यार्थी किनाऱ्यावरील संकलन गोळा करून ट्रकमध्ये टाकत होते.
गणेशमूर्ती घेवून भाविक मांडवी किनाऱ्यावर आलेनंतर निरोपाची आरती करून मूर्ती विसर्जनासाठी उपस्थित स्वयंसेवकांकडे ताब्यात देण्यात येत होती. मांडवी येथील हौशी मंडळाचे कार्यकर्ते सालाबादप्रमाणे विसर्जन करीत होते. विसर्जनस्थळावर प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशीरापर्यत विसर्जनासाठी भाविक येत होते.
पोलिस प्रशासनाकडूनदेखील मांडवी किनाऱ्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांचा तंबू किनाऱ्यावर लावण्यात आला होता. लाईफ जॅकेटस्ची व्यवस्था करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

पोलिस ठाणेखासगीसार्वजनिकपोलिस ठाणेखासगीसार्वजनिक
रत्नागिरी शहर४०१५रत्नागिरी ग्रामीण७६९२०
जयगड१७०५२संगमेश्वर९६५६०
राजापूर१०६७००नाटे२९५००
लांजा११७७००देवरूख८१३००
सावर्डे९३२२०चिपळूण१००५०३
गुहागर९०२००अलोरे५३०५०
खेड१००२०१दापोली२५००१
मंडणगड३०७५१बाणकोट३१९२
पुर्णगड५००१दाभोळ१२७९०
एकूण१०४३६४१६

बॉम्बशोध पथक, अग्निशमदलाचा बंबही तैनात ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांकडून देखील वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. केवळ गणपती नेणाऱ्या गाड्यांना किनाऱ्याकडे सोडण्यात येत होते. इतर गाड्यांना ऐंशी फूटी हायवेवर पार्किग देण्यात आले.

Web Title: Come on next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.