या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:42+5:302021-03-22T04:27:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : सध्याच्या कडक उन्हाळ्यात माणसाच्या जीवाची काहिली हाेते. आपण माणसे या उकाड्यात थंडाव्यासाठी अनेक उपाय ...

Come on Chiu Kau, eat a little! | या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ!

या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ!

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : सध्याच्या कडक उन्हाळ्यात माणसाच्या जीवाची काहिली हाेते. आपण माणसे या उकाड्यात थंडाव्यासाठी अनेक उपाय करतो. मात्र, ज्या पशुपक्ष्यांना स्वतःचं घरदार नाही, हक्काचं पाणी नाही, त्या मुक्या प्राण्यांनी काय करावं? या मुक्या प्राण्यांसाठी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चंद्रनगर येथील विद्यार्थ्यांनी ‘दाणापाण्याची’ व्यवस्था करून छोट्याशा वयातच सामाजिक भान जपलं आहे.

सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने संपूर्ण जगालाच विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. माणूस स्वतःच्या सुखसोयींसाठी निसर्गाची कत्तल करीत आहे. त्यामुळेच तापमान कमालीचं वाढलं आहे. अशा वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी माणसाने अनेक उपकरणं शोधून काढली आहेत. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे नैसर्गिक साठेही कोरडे पडले आहेत. अशा अनेक पर्यावरणविषयक समस्यांवर उपाय करण्यासाठी चंद्रनगर शाळेतील विद्यार्थी पदवीधर व उपक्रमशील विषय शिक्षक बाबू घाडीगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरणपूरक उपक्रम राबवित असतात. नैसर्गिक पाण्याचे साठे कोरडे पडल्याने पाण्यासाठी वणवण उडणारी पाखरे पाहून या पाखरांसाठी आपण काहीतरी करायला हवे, हा विचार पुढे आल्यावर बाबू घाडीगांवकर यांच्या कल्पनेतून ‘या रे चिऊ काऊ, खा रे थोडा खाऊ’ हा उपक्रम मुलांनी प्रत्यक्ष करायचं ठरवलं.

शालेय विद्यार्थ्यांच्या या समाजभानाचं शाळेच्या मुख्याध्यापिका कोळेकर, अर्चना सावंत, मानसी सावंत, मनोज वेदक, गिम्हवणे केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर, दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अविकारी पद्मन लहांगे, दापोलीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर व सर्व सदस्यांनी कौतुक केलं आहे.

चाैकट

टाकाऊ वस्तूंचा उपयाेग

घरात अडगळीत पडलेले तेलाचे कॅन कापून मुलांनी दोन भांडी तयार केली. एका भांड्यात पाणी, तर दुसऱ्या भांड्यात धान्य व्यवस्थित ठेवता येईल, अशा प्रकारे शाळेच्या बागेतल्या एका डेरेदार झाडाच्या फांद्यांना ही दोन्ही भांडी टांगून ठेवली आहेत. त्यामुळे पाखरांसाठी दाणापाण्याची व्यवस्था झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच आजूबाजूला भटकणारी पाखरे भांड्यांतील पाणी व दाणे खाऊ लागली.

Web Title: Come on Chiu Kau, eat a little!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.