शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकीला गणपतीपुळ्यामध्ये या, पण समुद्रात प्रवेश नाही, जिल्हा प्रशासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 17:09 IST

Ganpatipule News: श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत.

रत्नागिरी : श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला अनेक भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने प्रशासनाने काही निर्बंध नव्याने जारी केले आहेत. त्यानुसार दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यासंदर्भात परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येतात.

श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले भाविक दर्शनानंतर किंवा दर्शनाआधी श्री क्षेत्र गणपतीपुळे लगत असलेल्या समुद्रामध्ये / समुद्र किनारी आंघोळ किंवा पोहण्यासाठी जातात व अशा वेळी समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे यापूर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोणीही पाण्यात बुडण्याचा प्रकार घडू नये तसेच कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार, नागरिकांची जीवितहानी होऊ नये, म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे याठिकाणी दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही भाविकास श्री क्षेत्र गणपतीपुळे लगतच्या समुद्राच्या पाण्यात जाण्यास या आदेशाव्दारे मनाई करण्यात येत आहे.याखेरीज स्टॉल्स लावण्यासाठीही लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRatnagiriरत्नागिरी