दापोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हर्णै येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चाच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली असली तरी महिन्याभरातच ही डागडुजी ढासळली आहे.या किल्ल्याच्या तटबंदीच्या डागडुजीचे काम मे महिन्यात करण्यात आले. येथील जुनी तटबंदी अजूनही मजबूत असून, डागडुजी केलेली तटबंदी मात्र महिन्याभरातच आडवी झाली आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र काही दिवसातच ते काेसळल्यामुळे पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण झाली आहे.या प्रकारामुळे शिवप्रेमी व इतिहासप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. काम पूर्ण होण्याआधीच कोसळू लागले, तर या किल्ल्याचे भवितव्य काय, असा प्रश्नही शिवप्रेमी करत आहेत. या घटनेची तत्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि विभागीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
Ratnagiri: ऐतिहासिक गोवा किल्ल्याच्या डागडुजी केलेल्या भागाची महिन्याभरातच पडझड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 14:02 IST