रत्नागिरीत स्वच्छता मोहीम जोरात, किनाºयावर सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:50 IST2017-10-02T18:49:20+5:302017-10-02T18:50:25+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. रत्नागिरीतील विविध शासकीय कार्यालयांच्या आवाराचा परिसर, शहरी व ग्रामीण भागात तसेच किनाºयावर जमलेला कचरा उचलून कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.

रत्नागिरीतील विविध शासकीय कार्यालयांच्या आवाराचा परिसर, शहरी व ग्रामीण भागात तसेच किनाºयावर जमलेला कचरा उचलून कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
रत्नागिरी, दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात सर्वत्र संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. रत्नागिरीतील विविध शासकीय कार्यालयांच्या आवाराचा परिसर, शहरी व ग्रामीण भागात तसेच किनाºयावर जमलेला कचरा उचलून कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते सोमवारी सकाळपासून स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. शहरातील प्रत्येक भागात त्यांचे कार्यकर्ते कचरा उचलणे, रान काढणे आदी कामात व्यस्त होते. शहरातील भाट्ये किनाºयाचीही धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या एका पथकाने स्वच्छता केली.
पर्यटकांबरोबर स्थानिक नागरिकांची बीचवर होणारी गर्दी व त्यामुळे किनाºयावर जमलेला कचरा उचलून कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. कार्यकर्ते मनापासून सफाईच्या कामात व्यस्त झाले होते.