क्लीनरचा मृत्यू, ट्रकचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST2021-03-28T04:29:37+5:302021-03-28T04:29:37+5:30
रत्नागिरी : ट्रकखाली झोपलेल्या क्लीनरचा गाडी अंगावरून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे घडली आहे. मेहबुब मलंग ...

क्लीनरचा मृत्यू, ट्रकचालकाला अटक
रत्नागिरी : ट्रकखाली झोपलेल्या क्लीनरचा गाडी अंगावरून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे घडली आहे. मेहबुब मलंग असे मृत क्लीनरचे नाव आहे. हनुमंत माने असे ट्रकचालकाचे नाव असून, जयगड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जयगड येथील हनुमंत संताप्पा माने (४५, रा. बुधणी रेल्वे स्टेशन, अक्कलकोट) हा ट्रक (केए ३२ / डी ५२५२) घेऊन जयगड ते निवळी रोडने जिंदाल कंपनीमध्ये जात होता. वाटेत आगरनरळ येथे ब्रेकडाऊनमुळे माने याने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतला. त्या वेळी सोबत असलेला क्लीनर मेहबुब हाजी मलंग (३४, रा. गुलबर्गा शाहबाद, कर्नाटक) हा माने याला सांगून झोपायला गेला.
मेहबुब ट्रकखाली झोपला होता. थोड्या वेळाने माने याने ट्रक सुरू केला आणि पुढे आणला. मात्र या वेळी ट्रकखाली झोपलेल्या मेहबुबच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून माने याला अटक करण्यात आली आहे.