शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

चिपळुणात महाविद्यालयीन तरुणांच्या दोन गटात हाणामारी, पोलीस येताच केलं पलायन

By संदीप बांद्रे | Published: September 20, 2022 7:03 PM

या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा

चिपळूण : शहरातील एका महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटात राडा झाल्याची घटना मंगळवारी (२० सप्टेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना शहर प्रमुखांच्या संपर्क कार्यालयासमोर हा प्रकार सुरु होता. मात्र, पोलीस येताच सर्वच तरुणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात दोन गटात मारामारी झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर ओझरवाडी येथे मंगळवारी दोन गटात क्षुल्लक कारणातून राडा झाला. नजीकच्या एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. त्यानंतर हे दोन गट थेट महामार्गावर आले. त्याठिकाणी दोन्ही गटांनी एकमेकास शिविगाळ करत दगडफेक सुरु केली. अशातच पोलिसांना ही माहिती समजल्यावर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस येत असल्याचे पाहून सर्वच तेथून पसार झाले.विशेष म्हणजे याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी दोन गटात मारामारी झाली होती. पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याने त्यांनी सर्व तरुणांना पोलीस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले व शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना समज देत सोडून देण्यात आले होते.या परिसरात क्षुल्लक कारणातून मारामारीचे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा आहे. यापूर्वी असे प्रकार क्वचितच होत असत. सद्यस्थितीत असे प्रकार वाढले असून, याची कल्पना महाविद्यालयीन प्रशासनास नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस