‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

By Admin | Updated: October 14, 2014 23:24 IST2014-10-14T22:02:54+5:302014-10-14T23:24:16+5:30

प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे.

CISF jawans also came under the 'Clean India Clean School' campaign | ‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

‘स्वच्छ भारत स्वच्छ शाळा’ अभियानात सीआयएसएफ जवानही सरसावले

असगोली : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ उपक्रमांतर्गत आरजीपीपीएल येथील सीआयएसएफच्या जवानांनी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंजनवेल नं. २ कातळवाडी येथे जाऊन परिसर स्वच्छ करुन एक नवा आदर्श घालून दिला.शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रभावी जाणीव व्हावी, त्यातून घर, शाळा परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशा पद्धतीने देश स्वच्छतेतून समृद्ध बनावा. याकामी प्रत्येक भारतीय नागरिकाने योगदान द्यावे. आरजीपीपीएल, सीआयएसएफ युनिटचे उपकमांडंट महेश पोडवाल यांच्या नेतृत्त्वाखाली सहाय्यक कमांडंट सुनील गोयर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांच्या पथकाने अंजनवेल नं. २ शाळेचा परिसर श्रमदानातून स्वच्छ केला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी स्वत: बनवलेल्या पाना-फुलांच्या पुष्पगुच्छांनी जवानांचे स्वागत करुन भारतीयांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छताविषयक जाणीव जागृती व महत्व पटवून देण्यात आले.या उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अवधूत राऊतराव, उपशिक्षिका सुलक्षणा करडे - राशिनकर, शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याचे सहाय्यक कमांडंट गोयर यांनी सांगितले.
त्यावेळी सीआयएसएफचे निरीक्षक राजीव शर्मा, रामनारायण प्रसाद गुप्ता, राकेश राजवाल व अन्य सीआयएसएफ आरजीपीपीएल युनिटचे अधिकारी व जवान उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील अंजनवेल - कातळवाडी शाळेत राबविण्यात आलेल्या जवानांच्या उपक्रमाबद्दल त्या परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: CISF jawans also came under the 'Clean India Clean School' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.