चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची दुरूस्ती होणार
By Admin | Updated: March 30, 2015 00:25 IST2015-03-29T22:17:41+5:302015-03-30T00:25:18+5:30
नगर परिषद : आम्ही चिपळूणकरने मानले पालिकेचे आभार

चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्राची दुरूस्ती होणार
चिपळूण : गेले दशकभर दुरुस्तीविना खितपत पडलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र्रांच्या दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रियेला सुरूवात केल्याबद्धल आम्ही चिपळूणकरतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांची नगर परिषदेत प्रत्यक्ष भेट घेऊन आभार व्यक्त करण्यात आले. केंद्राच्या दुुरुस्तीला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्णत्त्वास न्यावे तसेच हा दुुरुस्तीचा आराखडा कसा आहे तो दाखवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोकणातील सर्वांत पहिले सुुसज्ज ठरलेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे चिपळूणमधील कलाकारांची, रसिकांची फार मोठी गैरसोय झाली होती. एकीकडे नवनवे कलावंत आपली कला प्रदर्शित करण्यासाठी झगडत आहेत, राज्यस्तरावर चिपळुणातील अनेक कलाकार आपली छाप पाडत आहेत आणि दुसरीकडे शहरात कलाकारांना सहज उपलब्ध होईल, असे सांस्कृतिक भवन नाही. याची खंत जनतेला सतत जाणवत होती. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यापासून आम्ही चिपळूणकर या नावाने लोक संघटीत होत गेले. नगर परिषदेला प्रत्यक्ष निवेदने देऊन सांस्कृतिक केंद्र्राच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली. यातून जोपर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र कलाकार, रसिकांच्या सेवेत रूजू होत नाही तोपर्यंत केंद्राच्या पारावर कार्यक्रम करण्याचा विचार पुढे आला आणि दोन कार्यक्रम पार पडले. त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. जनतेच्या या आवाहनाची दखल घेऊन नगर परिषदेने आपली कार्यवाही अ गतिशील केली आणिदुरूस्तीची निविदा प्रक्रिया सुरू झाली. आम्ही चिपळूणकरचे अनेक कार्यकर्ते, कलाकार नगर परिषदेजवळ एकत्र आले. या सर्वांनी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या दालनात त्यांना पुष्पगुच्छ दिला. उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांचेही आभार मानले.
यावेळी नियोजन आणि विकास समितीचे सभापती शौकत काद्री, राजन इंदुलकर, निशिकांत पोतदार, राजू जाधव, प्रकाश सरस्वती गणपत, प्रताप गजमल, वेदिका पडवळ, सचिन कांबळे, डॉ. दिलीप ओतारी, तिवरेकर , रुपेश धाडवे, सिद्धेश पाथरे, महेश कापरेकर, जितेश जाधव, रमेश शिंदे, श्रुती नित्सुरे, सुप्रिया लाड, प्रथमेश जाधव, प्रणव कोलथरकर, आकाश कांबळी, रोहित बेर्डे, नितीन सकटे, सागर शिरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)