चिपळूण खरेदी - विक्री संघाची निवडणूक बिनविरोध
By Admin | Updated: June 20, 2015 00:36 IST2015-06-19T23:07:47+5:302015-06-20T00:36:48+5:30
१६ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने

चिपळूण खरेदी - विक्री संघाची निवडणूक बिनविरोध
चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची २०१५-१५ ते २०२०-२१ ची निवडणूक आज (शुक्रवारी) बिनविरोध झाली. १६ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी माहिती संचालक अशोक कदम यांनी दिली.
चिपळूण तालुका खरेदी - विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक सहाय्यक उपनिबंधक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ३० मे ते ३ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ५ जून ते १९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत आज अखेरच्या दिवशी इतर मागास प्रवर्गातून सुरेश खापले, व्यक्तीगत मतदार संघातून कृष्णा खांबे, सत्यविजय शिंदे, महिला राखीवमधून राधिका माटे, सहकारी संस्था मतदार संघातून संतोष चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकारी संस्था मतदार संघातून चिपळूण गटातून दिलीप माटे, कापरे गटातून विजय शिर्के, कात्रोळी गटातून पांडुरंग माळी, ताम्हणमळा गटातून सदाशिव चव्हाण, मार्गताम्हाणे गटातून चंद्रकांत चव्हाण, सावर्डे गटातून अमित कोकाटे, नांदगाव गटातून संजीवकुमार गुजर, निवळी गटातून किसन महाडिक, कळकवणे गटातून अशोक कदम, शिरगाव गटातून तुकाराम बंगाल हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय मतदार संघातून कृष्णा खांबे, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून दिनेश माटे, व्यक्तीगत मतदार संघातून शिवाजी चिले, अनुसूचित जाती जमातीमधून दिलीप चिपळूणकर, महिला प्रतिनिधी स्मिता सुभाष चव्हाण, फैरोजा मोअज्जम म्हाते यांची बिनविरोध निवड झाली.
१६ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे व संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती संतोष चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सईद खलपे, विद्यमान चेअरमन चंद्रकांत चव्हाण व सर्व संचालक यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले अशी माहिती संचालक अशोकराव कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)
खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडीने सहकार क्षेत्रात आनंद.
५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोधचा मार्ग झाला सुकर.
१६ जागांसाठी दाखल झाले होते २१ अर्ज.
सहकारातील जाणकारांनी केली मध्यस्थी.
माटे यांच्या निधनानंतरची पहिलीच बिनविरोध निवडणूक.