शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

चिपळूण नगर परिषदेच्या खताला हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड; मार्केटिंग, अधिकृत विक्री करता येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:03 IST

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. या खताला ...

चिपळूण : शहरातील शिवाजीनगर येथील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जात आहे. या खताला शासनाकडून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड मिळाला आहे. यामुळे नगर परिषदेला आता आपल्या खताचे मार्केटिंग आणि अधिकृत विक्री करता येणार आहे.चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दैनंदिन सुमारे ६-७ टन इतका ओला कचरा निर्माण होत आहे. हा ओला कचरा नगर परिषदेच्या घंटागाडीमार्फत वेगळा जमा केला जाताे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर चिपळूण नगर परिषदेच्या शिवाजीनगर येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीन व बायोगॅसद्वारे प्रक्रिया करण्यात येते. या प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खत व वीजनिर्मिती केली जात आहे. तयार झालेल्या खताची तपासणी करण्यासाठी खतनियंत्रण प्रयोगशाळा कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते. त्यानुसार खत तपासणी अहवाल प्राप्त झाला होता.

हा अहवाल राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी मुंबई यांच्याकडे हरित ब्रँडसाठी पाठविण्यात आला होता. राज्य अभियान संचालक यांच्याकडून खत तपासणी अहवालाची छाननी केली गेली. हरित ब्रँडसाठी लागणारी सर्व गुणांकने एफसीओ मानकानुसार बसत आहेत. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेकडे असणाऱ्या खताला शासन स्तरावरून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड मिळाला आहे.

नगर परिषदेने तयार केलेल्या खताला हरित महासिटी कंपाेस्टस ब्रँड मिळाला आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या खताची विक्री केली जाणार आहे. ज्या नागरिकांना खत पाहिजे असेल त्यांनी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. - विशाल भोसले, मुख्यााधिकारी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण