चिपळूण बाजारपूल मागी

By Admin | Updated: February 6, 2015 00:40 IST2015-02-05T20:25:49+5:302015-02-06T00:40:06+5:30

नगर परिषद : पूल जोडणार विकासाचा सेर्तू

Chiplun marketplace | चिपळूण बाजारपूल मागी

चिपळूण बाजारपूल मागी

उत्तमकुमार जाधव - चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवर बांधण्यात येणाऱ्या, बाजारपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, हे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या विकासात या पुलामुळे विशेष भर पडणार आहे. शहरातील नाईक कंपनीसमोरील वाशिष्ठी नदीवर १९६०-६१च्या दरम्यान पूल बांधण्यात आला होता. गोवळकोट, पेठमाप आदी भागातील नागरिकांच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे. २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे या पुलाला धोका निर्माण झाला. तत्कालीन नगराध्यक्ष उषा लवेकर यांच्या कारकीर्दीत तत्कालीन नगर विकास मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे पुलाच्या कामाबाबत २००६मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला.
तत्कालीन नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांनी २००८ मध्ये बाजारपूल होण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा, यासाठी माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार सुरु केला. तत्कालीन नगराध्यक्ष अजमल पटेल यांच्या कारकीर्दीत २ सप्टेंबर २०१०मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभाग यांच्याकडे ठराव प्रारित करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर ७ जानेवारी २०१० मध्ये पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. मात्र, हे काम २ वर्ष रखडल्याने या भागातील रहिवाशांनीही पुलाचे काम त्वरित सुरु करण्याबाबत नगर परिषदेवर धडक मोर्चाही दिला होता. त्यानुसार, १९ जुलै २०१२ रोजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य सभेत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. आर्किटेक्ट आगरकर यांच्याकडून या पुलाच्या बांधकामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून घेण्यात आले. त्यानुसार, ७ जुलै २०१३ रोजी पुलाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ९ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार, १३ जून २०१४ रोजी या पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सध्या नदीमध्ये ३० फूट अंतरावर ६ पाईल्स टाकण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात आणखी ६ पाईल्स टाकल्या जाणार आहेत. एकूण २४ पाईल्स टाकल्यानंतर उर्वरित काम हाती घेतले जाणार आहे. एस. डी. इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई या कंपनीस हे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१५ अखेर या पुलाचे काम करण्याची मुदत ठेकेदारास देण्यात आली असून, मुदतीत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ९० मीटर लांबीचा व ८.२५ मीटर रुंदीचा हा पूल उभा होणार असल्याने, शहराच्या वैभवात या पुलामुळे भर पडणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करुन मुदतीत पूल रहिवाशांसाठी खुला करण्याच्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.

अठरा महिन्यांत काम पूर्ण करणार
वाशिष्ठी नदीत ३० फूटाचे ६ पाईल्स (खांब) टाकण्याचे अधिकांश काम पूर्ण.
२४ पाईल्स टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, उर्वरित काम सुरु होणार.
येत्या आठवड्यात आणखी ६ पाईल्स.
६ कोटी ९८ लाख २५ हजार ३७५ रुपयांचे अंदाजपत्रक.
कामाची मुदत १८ महिन्यांची.

Web Title: Chiplun marketplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.