शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

चिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:47 IST

चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी २५ प्रगणक काम करत आहेत.

ठळक मुद्देचिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरुपशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन काम

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी २५ प्रगणक काम करत आहेत.पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, चिपळूण केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार तालुक्यात २०व्या पशुगणनेचे काम सुरु आहे. या पशुगणनेची मुदत दि. ३१ मार्चपर्यंत असल्याने कर्मचाऱ्यांना गणना पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हे काम करण्यासाठी कर्मचारी पूर्णपणे गुंतले आहेत. कमी कालावधी असल्यामुळे ही गणना कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पशुगणनेसाठी तालुक्यातून २५ प्रगणक काम करत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त ताण पडत आहे. सुरुवातीला ही गणना सुशिक्षित तरुणांकडून केली जाणार होती. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनाच ही गणना करण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.पशुगणनेसाठी आॅनलाईन पद्धत अमलात आल्यानंतर त्यांच्या प्रक्रियेसाठी २०१८ हे वर्ष उजाडले आहे. आॅनलाईनसाठी टॅबचे वितरण, तर नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण यामुळे प्रक्रियेला वेळ लागला. डिसेंबर २०१८पासून हे काम सुरु झाले आहे.

आज भौगोलिक परिस्थिती पाहता बराच भाग हा ग्रामीण असल्यामुळे त्या ठिकाणी आॅनलाईन पध्दतीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच या गणनेची माहिती ग्रामीण भागात म्हणावी तशी पोहोचली नसल्याने या पशुगणनेची नोंदी करताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पशुगणनेचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी