नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:43 PM2019-09-17T23:43:37+5:302019-09-17T23:43:44+5:30

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र ...

Chief Minister will bring back Nanar again | नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

Next

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजापुरात दिले. प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांचा उत्साह पाहता नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. आज यावर काहीही भाष्य करता येणार नाही. मला पुन्हा बोलवा, असे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेप्रसंगी राजापूर येथे जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्पावरूनच शिवसेना-भाजपमधील युती ताणली गेली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान शिवसेनेला इशाराच मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाजनादेश यात्रा राजापुरात आली. महामार्गावर एस. टी. आगारासमोरच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. आम्हाला प्रकल्प हवा आहे, असा फलक घेतलेले असंख्य समर्थक तेथे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी प्रकल्प हवा असल्याच्या घोषणा दिल्या. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नाणार रिफायनरीसंदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे घसा फोडून सांगत होतो. मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा राजापूरात सुमारे दोन तास उशिराने पोहोचली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री विनोद तावडे,आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यासाठी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवरुन म्हणजेच टाकेवाडी येथून बाईक रॅलीने करण्यात आले. राजापूर एस. टी. आगारासमोर मंडप घालण्यात आला होता, मात्र उशीर झाल्याने मुख्यमंत्र्यानी आपल्या रथावरुनच उपस्थितांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनिमित्त मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आमच्या भाजपा आघाडी सरकारने पाच वर्षात अनेक कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आलो आहे. तुमचे आशिर्वाद असेच कायम पाठीशी राहुदे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री...
‘‘अगोदरपासूनच मी रिफायनरी नाणारला व्हावी म्हणून आग्रही होतो. ही ग्रीन रिफायनरी आहे. यातून कोकणातील तरुणांना एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मी घसा फोडून सांगत होतो. त्यावेळी झालेला विरोध पाहून आम्हाला रिफायनरी रद्द करावी लागली होती . मात्र आता मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी नाणारला रिफायनरी होण्यासाठी चर्चा होऊ शकते. तुमचा हा उत्साह पाहून समाधान वाटते.’’

Web Title: Chief Minister will bring back Nanar again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.