आंबा नुकसानाबाबत आता मुख्यमंत्र्यांना साकडे
By Admin | Updated: May 9, 2014 00:23 IST2014-05-09T00:23:28+5:302014-05-09T00:23:28+5:30
रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

आंबा नुकसानाबाबत आता मुख्यमंत्र्यांना साकडे
रत्नागिरी : वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात अवेळी पडणार्या पावसासह वादळी वार्याने धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना बसला आहे. या बागायतदारांना कर्जमाफी मिळावी, व्याजमाफी मिळावी. अर्थसाह्य मिळावे अथवा अनुदान मिळावे, अशी मागणी कीर यांनी मुख्यमंत्री चव्हाण व उद्योगमंत्री राणे यांच्याकडे केली आहे. आधीच युरोपीयन देशांनी नाकारलेला आंबा संकटात होता, त्यात आता वादळी वार्याने मोठा फटका बसला आहे. लवकरच आपण आंबा बागायतदार संघाच्या पदाधिकार्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही कीर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)