छावा प्रतिष्ठानने केली कवी केशवसुत स्मारकाची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST2021-08-13T04:35:30+5:302021-08-13T04:35:30+5:30

रत्नागिरी : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सुनील धावडे संस्थापित छावा प्रतिष्ठान या संस्थेकडून मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत ...

Chhava Pratishthan cleans the Keshavsut memorial | छावा प्रतिष्ठानने केली कवी केशवसुत स्मारकाची सफाई

छावा प्रतिष्ठानने केली कवी केशवसुत स्मारकाची सफाई

रत्नागिरी : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सुनील धावडे संस्थापित छावा प्रतिष्ठान या संस्थेकडून मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत स्मारक परिसरातील स्वच्छता करण्यात आली. कोरोनाच्या काळातही या संस्थेने स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल या संस्थेला धन्यवाद देण्यात आले.

अभियानाच्या प्रारंभी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील व कार्यवाह कीर यांनी छावा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

छावा प्रतिष्ठानचे मुख्य सचिव समीर गोताड, प्रवक्ता संगम धावडे यांच्या पुढाकाराने आणि कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील व कार्यवाह कीर यांच्या सहकार्याने अभियानास सुरुवात झाली.

या अभियानात प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्मारक परिसरातील गवत, पडलेली झाडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत, वेली यांची स्वच्छता केली. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुरज पवार यांनी या मोहिमेसाठी वस्तुरूपात सहकार्य केले. संस्थेचे सदस्य प्रशांत कांबळे, संदेश धावडे, राहुल धावडे, विजय धावडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Chhava Pratishthan cleans the Keshavsut memorial