शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित कामगारांना आश्रय, तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:08 IST

कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देकोरोनाबाधित कामगारांना आश्रय देणाऱ्या तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल सलून व्यावसायिकावरही गुन्हा, पूर्व कल्पना न देता दिला आश्रय

रत्नागिरी : कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़जयगड येथील आंग्रे पोर्टमध्ये दोन जहाजे दुरुस्तीच्या कामासाठी दाखल झाली होती़ या जहाजांवर एकूण १३ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती़ चाचणीनंतर त्यापैकी ३ जण गणपतीपुळ्यातील हॉटेल अभिषेक, २ जण हॉटेल विसावा आणि ८ जण हॉटेल एकदंतमध्ये राहिले होते़ या लोकांची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाला देण्याची आवश्यकता होती़ मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी त्यांना ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून दडवून ठेवली होती़हॉटेल अभिषेकमध्ये ठेवण्यात आलेले लोक गणपतीपुळे बाजारपेठेमध्ये फिरले होते़ त्यांनी बाजारपेठेतील एका केशकर्तनालयात जाऊन केसही कापले होते़ दरम्यान, या १३ जणांपैकी ३ जणांच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या परिसरात खळबळ उडाली होती़ दरम्यान, लोकांमध्ये हॉटेल व्यावसायिकांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता़ त्याचबरोबर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव व अन्य तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती़दरम्यान, जयगड, गणपतीपुळे परिसरातील लोकांच्या जीवितेचा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे़ कामगारांची माहिती दडविल्याप्रकरणी हॉटेल अभिषेकचे मालक प्रसाद त्र्यंबकेश्वर तोडलकर, हॉटेल एकदंतचे मालक प्रसाद कृष्णा बेलगांवकर, हॉटेल विसावाचे मालक राजेश श्रीधर केदारी आणि सलून व्यावसायिक हलीम गुलामनबी शेख या चार जणांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस