शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Parshuram Ghat: परशुराम घाट बंदच्या वेळेत बदल, चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:12 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात वाहतुकीमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात वाहतुकीमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी ११ ते ५ या वेळेत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नागरिक व लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सोयीनुसार या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत वाहतुकीसाठी घाट बंद राहणार आहे.गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडू लागल्याने या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच घाटात काम सुरू असताना दगड कोसळून काही घरांचे नुकसानही झाले होते. या घटनेमुळे रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे अवघ्या महिनाभरात सुमारे दीडशे मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली. अजूनही काही भागातील संरक्षक भिंतीचे काम शिल्लक आहे.मात्र, आता संबंधित कल्याण टोलवेज व ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या दरडीच्या बाजूने खोदाई सुरू केली आहे. सुमारे २३ मीटर उंच दरडीचा भाग असल्याने घाटातील हा अतिशय अवघड टप्पा मानला जात आहे. आता पावसाळ्यापूर्वी डोंगर कटाई करून तातडीने तेथेही संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २५ हून अधिक पोकलेन, डंपर, डोजर अशी यंत्रणा कामाला लावली आहे.साधारण २५ मे पासून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयारी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण जून महिना हे काम सुरू ठेवले जाणार आहे. अशातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अन्य नागरिकांच्या सूचनेनुसार या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आला असून तसे पत्र प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.'या' मार्गे वाहतूक मात्र ग्रामस्थ धुळीने हैराणपरशुराम घाट बंद असताना लोटे, चिरणी, कळंबस्ते या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ येत असल्याने वाहतूकदारांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही धुळीमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या पर्यायी मार्गावरही चिखल व अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी