कोकणात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST2021-09-23T04:35:38+5:302021-09-23T04:35:38+5:30
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे आज, गुरुवारी कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील ...

कोकणात आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे आज, गुरुवारी कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट, जोरदार स्वरूपाच्या पावसाची, तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत ५०९ (सरासरी ५६.५७ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे.
आज, गुरुवारी कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारी (दि.२५)नव्याने चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची, तर मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२६ सप्टेंबरला कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची, तर मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. मंगळवारी रात्रीपासून अधिकच जोर घेतलेल्या पावसाने बुधवारीही जोर कायम ठेवला. दिवसभर पावसाळी वातावरण कायम होते. रात्री पुन्हा जोर अधिक वाढला.