शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेबाबत केंद्रातर्फे संस्थेकडून पाहणी, लवकरच अहवाल सादर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 16:07 IST

केंद्र सरकरने नव्या उपाययोजना राबवण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) ही संस्था नियुक्त केली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता अतिवृष्टीमुळे खचल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे काही महिने घाट वाहतुकीस बंद ठेवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरने नव्या उपाययोजना राबवण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) ही संस्था नियुक्त केली आहे. सोमवारी या संस्थेने परशुराम घाटाची तपासणी केली. याबाबतचा अहवाल लवकरच ही संस्था केंद्र सरकारला सादर करणार आहे.  पावसाळ्यात डोंगर खचल्याने परशुराम घाट पावसाळ्यात दीर्घकाळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. संरक्षक भिंतीसह वेगवेगळ्या उपाययोजना करूनही वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळेच कोकणात डोंगर भागातून गेलेल्या घाट रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना सूचवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) या संस्थेला कोकणात पाठवण्याचा निर्णय घेतला.सोमवारी या संस्थेचे स्ट्रक्चरल इंजिनिअर संदीप रल्लान, आकाश काला या दोन अभियंत्यांनी सुरुवातीला वरंध घाट व नंतर कशेडीची पाहणी केली. ते दुपारी परशुराम येथे दाखल झाले. यावेळी येथील राष्ट्रीय महामार्गचे उपविभागीय अभियंता पी. व्ही. निगडे, यांच्यासह ब्ल्यूम कंपनीचे टीम लीडर संजय रॉय, मुजुमदार यांच्यासह कंत्राटदार कंपनीचे अभियंते उपस्थित होते. परशुराम घाटात माथ्यावरील भागात काही बदल करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. पायथ्याशी योग्य पद्धतीची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मत त्यांनी नोंदवले. या संपूर्ण घाटाची पाहणी आणि उपाययोजना याबाबतचा अहवाल ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला देणार आहेत.टेहरी संस्थेचे उत्तराखंडसह देशात मोठे कामटेहरी या संस्थेचे उत्तराखंडसह देशातील अन्य डोंगराळ भागात मोठे काम आहे. त्या भागात डोंगर खचून होणाऱ्या अपघातावर त्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. कोकणातील घाट सुरक्षित व्हावेत, यासाठी त्यांची मदत घेतली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी