कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:32+5:302021-04-02T04:33:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले ...

Center for Agricultural Inputs Diploma Course started | कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू

कृषी निविष्ठा पदविका अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे कृषी पदवी, पदविका शैक्षणिक अर्हता नाही त्यासाठी आझाद हिंद विकास संस्थेमार्फत जिल्ह्यास एका वर्गात मंजुरी मिळाली आहे. या अभ्यासक्रम केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

केंद्र सरकारतर्फे हैद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थेमार्फत (मॅनेज) एक वर्ष अभ्यासक्रम सुरू केला आहे. जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक यांना प्राधिकृत केले आहे. या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनावेळी जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, आत्मा १च्या प्रकल्प उपसंचालक उर्मिला चिखले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी गोरक्षनाथ मुरकुटे उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चाळीस कृषी सेवा केंद्र व सहकारी सोसायटी यांचे विक्रेते यावेळी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.

देसी अभ्यासक्रमाचे फॅसिलेटर म्हणून आझाद हिंद विकास संस्थेचे अध्यक्ष विनय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमावेळी संस्थेचे सल्लागार मंडळ अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, खजिनदार तथा कार्याध्यक्ष विशाल ढोकळे, संस्थेचे सदस्य नितीन चव्हाण, डॉ. नम्रता उरुणकर उपस्थित होते.

Web Title: Center for Agricultural Inputs Diploma Course started