स्मशानभूमीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:57+5:302021-06-29T04:21:57+5:30
चिपळूण: रामतीर्थ स्मशानभूमीच्या शेडचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी गटनेते उमेश सकपाळ, बिलाल पालकर, सुधीर शिंदे, आशिष खातू तसेच ...

स्मशानभूमीचे काम पूर्ण
चिपळूण: रामतीर्थ स्मशानभूमीच्या शेडचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी गटनेते उमेश सकपाळ, बिलाल पालकर, सुधीर शिंदे, आशिष खातू तसेच बांधकाम सभापती मनोज शिंदे व आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी विशेष सहकार्य केले.
जिल्हाध्यक्षपदी साहिल आरेकर
गुहागर: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साहिल आरेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आरेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. साहिल आरेकर गेली दोन वर्ष या पदावर कार्यरत आहेत.
समस्या मार्गी लावा चिपळूण: चिपळूण रेल्वेस्थानकातील स्टॉलधारकांच्या अनेक प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, यासाठीचे निवेदन आमदार शेखर निकम यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांच्याकडे दिले. यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, स्टॉलधारक शेखर रेडीज, अविनाश खताते होते.
एसटी कामगार त्रासलेला
राजापूर : कोरोना काळातही काम करणाऱ्या एसटी कामगारांच्या वेतन आणि हजेरीबाबत आगाराकंडून होणारी मनमानी आणि अन्याय यामुळे एसटी कामगार त्रासलेला आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व आगारव्यवस्थापक व कामगार संघटना प्रनिनिधी यांची तत्काळ बैठक लावावी.
कोविड केअर सेंटर
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथे आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून येथील बापट महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार याची वेगाने तयारी सुरू झाली आहे. तयारीचा आढावा भाजपच्या शनिवारी वतीने घेण्यात आला.
देवरूखात वटपौर्णिमा
देवरूख : हम ग्रुप तर्फे सलग चौथ्या वर्षी वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. पोलीस निरीक्षक मारुती जगताप व किशोर जोएशी यांनी सहकार्य केले. ग्रुपचे अध्यक्ष अॅड. सरताज कापडी, सारा कापडी, सलमा वागळे उपस्थित होते.
रोपे लावली
राजापूर : राष्ट्रीय हरित सेना विभागार्फत येथील राजापूर हायस्कूलचे शिक्षक एक वेगळा उपक्रम राबवणार आहे. त्याचा प्रारंभ सर्व शिक्षकांनी कुंड्यांमधून उपयोगी वनस्पती लावून केली.
कक्षाचे उद्घाटन
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे येथे कोरोना रुग्णांच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती जयसिंग माने, जिल्हा परिषद सभापती सदस्या रजनी चिंगळे यांच्या उपस्थितीत झाले.
सॅनिटायझर फवारणी
जैतापूर: राजापूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणसुरे विभागातर्फे आंबेरकोणी व मिरगुलेवाडी या गावांतील विलगीकरण केलेल्या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केली.