रिगल स्कूलमध्ये योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST2021-06-26T04:22:10+5:302021-06-26T04:22:10+5:30

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल सी. बी. एस. ई. स्कूलमध्ये आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे ...

Celebrate Yoga Day at Regal School | रिगल स्कूलमध्ये योग दिन साजरा

रिगल स्कूलमध्ये योग दिन साजरा

चिपळूण : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल सी. बी. एस. ई. स्कूलमध्ये आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कोरोनामुळे योगादिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशालेमधील शिक्षिका पूजा देवळेकर यांनी योगसंबंधी माहिती व प्रात्य़क्षिके दाखवली. या उपक्रमांतर्गत योग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हाेता. यामध्ये उत्कृष्ट योगामध्ये सहावीतील सलोनी शिर्के हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिचे संस्थाध्य़क्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, प्राचार्य शंभू कर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी ईश्वरी दिवटे, अनिकेत चिले, दृशला कापडी, विहान सहस्त्रबुध्दे, झरीन कच्छी, नैतिक भोजने, निदा कच्छी, ओम पटेल, तनिष्का सावर्डेकर, सलोनी अमर शिर्के, मिझान कच्छी यांनी योगासने सादर केली.

Web Title: Celebrate Yoga Day at Regal School