काजुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST2021-08-17T04:37:02+5:302021-08-17T04:37:02+5:30

आबलोली : भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली (ता. गुहागर) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच रुक्मिणी ...

Celebrate Independence Day at Kajurli | काजुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

काजुर्ली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आबलोली : भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली (ता. गुहागर) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच रुक्मिणी सुवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली नं. १ येथे मुख्याध्यापक वासुदेव पांचाळ यांनी ध्वजारोहण केले.

या वेळी उपसरपंच सुधाकर गोणबरे, ग्रामपंचायत सदस्य मेघना मोहिते, सखी सावंत, स्नेहल गुरव, पोलीस पाटील सीमा लिंगायत, काजुर्ली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल पवार, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली नं. १ चे मुख्याध्यापक वासुदेव पांचाळ, ग्रामसेवक संजय गोरे, आरोग्यसेवक रवींद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामसेवक संजय गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Celebrate Independence Day at Kajurli