कोकण कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:12+5:302021-05-23T04:31:12+5:30

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४९ वा वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. सन २०२१-२२ ...

Celebrate the anniversary of Konkan Agricultural University online | कोकण कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा

कोकण कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन ऑनलाईन साजरा

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४९ वा वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. सन २०२१-२२ हे विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आलेल्या या वर्धापन दिनाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे अध्यक्षस्थानी होते.

त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री अनिल परब तसेच विद्यापीठ कार्यकारिणीचे सदस्य जयंत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम, प्रवीण देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अरविंद सावंत, डॉ. सुभाष पुरी, डॉ. शंकर मगर, डॉ. विजय मेहता, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. किसन लवांडे, डॉ. बी. वेंकटेश्वरल, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. के. पी. विश्वनाथा उपस्थित होते. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु डॉ. एस. एस. ढवण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरु डॉ. व्ही. एम. भाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत यांनी विद्यापीठाने मागील ४९ वर्षांत केलेल्या शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला. यावेळी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे सर्व उपस्थितांच्या साक्षीने ऑनलाईन विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी केले तर विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Web Title: Celebrate the anniversary of Konkan Agricultural University online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.