शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यथा काजू उत्पादकांच्या: आंब्याप्रमाणेच काजूलाही हवामानाचा मोठा फटका, मात्र..

By मेहरून नाकाडे | Updated: April 21, 2025 18:36 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे. पर्यावरणात होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे आणि विविध कीडरोग समस्यांनी हापूस आंब्याप्रमाणे काजू पीकही ग्रासले आहे. यावर्षी हापूसप्रमाणे काजू उत्पादन घटले आहे. यावर्षी ४० टक्केच पीक असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात पीक कमी असले तरी काजूच्या आयातीचे प्रमाण घटल्याने काजूचा दर समाधानकारक असल्याने बागायतदारांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.आंबा पिकाची जेवढी काळजी घ्यावी लागते, तेवढी काजूची घ्यावी लागत नाही. त्यापासून मिळणारे उत्पन्न हे आंब्याच्या तुलनेत कमी कष्टाचे आहे. पण, अलीकडच्या काळात हवामानातील बदलाचे परिणाम आंब्याप्रमाणे काजूवरही परिणाम करीत आहेत. त्यामुळे काजूच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ लागला आहे. यंदा या उत्पादनात मोठी घट दिसत आहे.अर्थात उत्पादन कमी असले तरी चांगल्या दरामुळे बागायतदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.काजू हंगामाची सुरुवात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून झाली. सुरुवातीला काजूला १७५ ते १८० रुपये दर मिळाला. बाजारातील आवक वाढली तशी दरात हळूहळू घट झाली. सध्या १५० ते १५५ रुपये दर आहे. मात्र, हा दर वेंगुर्ला ७ व ९ या जातीच्या काजू बीयास मिळत आहे. ही बी आकाराने मोठी आहे.परंतु, यावर्षी हवामानातील बदलामुळे वेंगुर्ला बी चा आकार कमी झाला आहे. त्यामुळे काजू बी विकत घेणारे व्यापारी वेंगुर्ला काजूची गणती गावठी काजू प्रकारात करू लागले आहे. वेंगुर्ला असल्याचे सांगूनही व्यापारी ऐकत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

विक्रेत्यांकडून फसवणूककाजू बी विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. दारावर येऊन काजू विकत घेत आहेत. परंतु, काजू मोजण्यासाठी वापरणाऱ्या काट्यात छेडछाड केली जाते. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. यावर नियंत्रण गरजेचे आहे.

आयात झाली कमीदरवर्षी परदेशातून काजू बी मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केली जाते. आयात होणाऱ्या काजू बीचा स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावर प्रभाव राहतो. त्यातून स्थानिक काजूचा प्रती किलो दर घटून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसतो. मात्र, यावर्षी काजू बी आयात कमी झाल्याने काजू बी दर मात्र समाधानकारक आहे.

प्रतिकूल हवामानामुळे काजूचे यावर्षीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे काजू हंगामासाठी केलेला खर्च व उत्पादन याचा मेळ बसविण्याची चिंता असताना काजू बीयास समाधानकारक दर मिळत असल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे. - संतोष गोनबरे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी