शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती, औषधी गुणधर्म सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:38 IST

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.

ठळक मुद्देसावर्डे फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिला संशोधनात यशऔषधाचा परिणाम २४ तास, काजूच्या चिकाची मागणी वाढण्याची शक्यता

चिपळूण : काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे पीक घेतले जाते. हजारो हेक्टर क्षेत्र काजू लागवडीने व्यापलेले असून, त्याला आता सरकारी अनुदानातूनही तितकाच हातभार लागत आहे. त्यामुळे कोकणात काजूच्या लागवडीचे प्रमाण वाढलेले असतानाच उत्पन्नही तितक्याच पटीत शेतकरी घेत आहेत. कोकणातील काजूला तितकीच मागणी असून, अत्याधुनिक फळ प्रक्रियेमुळे येथे काजूचे नवीन उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.तसे पाहिले तर काजूपासून काजूगर, ड्रायफूट्स म्हणून उपयोग होतो. शिवाय काजूच्या बोंडापासून मद्य तयार केले जाते. याविषयी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. तसेच काजूच्या बोंडापासून तयार केली जाणारी काजू फेणी हे मद्य गोव्यात तितेकच प्रसिद्ध आहे. मात्र, आता काजूच्या खोडापासून निघणाऱ्या चिकात पॉलिमर हा औषधी गुण असल्याचे भाग्यश्री चोथे हिने सिद्ध केले आहे.या औषधी गुणधर्मामुळे एखाद्या औषधाचा परिणाम २४ तास राहू शकतो, असेही या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात काजूच्या चिकाची मागणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या संशोधनासाठी प्रा. माया देसाई व प्रा. प्रवीण वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव अशोक विचारे, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी