सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:22+5:302021-04-25T04:31:22+5:30
सध्या जिल्ह्यात १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहे. यात सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ...

सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी केअर सेंटर
सध्या जिल्ह्यात १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहे. यात सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तीन शासकीय कोरोना रुग्णालये, दोन खासगी रुग्णालये, १३ डेडिकेटेड हेल्थ सेंटर (डी. सी. एच. सी.) आणि १४ कोरोना केअर सेंटर (सी. सी. सी.) सुरू केले आहेत. त्यामुळे या केंद्रांमधून चांगल्या प्रकारे रुग्णांवर उपचार होत आहेत. सध्या पाचही रुग्णालयात मिळून ४४५ रुग्ण, १३ डी.सी.एच.सी.मध्ये एकूण ३२७, तर १४ कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ६८२ रुग्ण उपचार घेत आहेत.
या रुग्णांसाठी कशा प्रकारे आहार घ्यावा, हे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्वत: समिती तयार करून त्या समितीच्या माध्यमातून सात दिवसांचा आहार निश्चित केला आहे. त्यामुळे उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासनाकडून करण्यात येणारे औषधोपचार, तसेच राहण्याचा खर्च, आदी सर्व मोफत असल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळत आहे.
कोरोना रुग्णालये (५ )
जिल्हा शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय, कळंबणी (खेड), तसेच अपेक्स व वालावलकर ही दोन खासगी रुग्णालये
एच. सी. एच. सी. (१३)
कामथे (चिपळूण) दापोली ही दोन उपजिल्हा रुग्णालये, तसेच रत्नागिरीतील शिवश्री हाॅस्पिटल, परकार हाॅस्पिटल, चिपळूणमधील लाइफकेअर हाॅस्पिटल, श्री हाॅस्पिटल, सिद्धिविनायक हाॅस्पिटल, दापोलीतील बी.एम.एच. हाॅस्पिटल, गुहागर ग्रामीण आरोग्य केंद्र, घरडा हाॅस्पिटल, खेड, देसाई हाॅस्पिटल लांजा, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय, एस.एम.एस. हाॅस्पिटल खेड
कोविड केअर सेंटर (१४)
रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हॅास्टेल, बी.एड काॅलेज, आयटी. आय. घरडा इन्स्टिट्यूट खेड, खेड नगरपरिषद, लांजा विद्यानिकेतन, छोटूभाई देसाई हाॅस्पिटल लांजा, खापणे काॅलेज रायपाटण, समाजकल्याण होस्टेल वहाळ, वेळणेश्वर, पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल, संगमेश्वर, समाज कल्याण होस्टेल रायपाटण.