महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक; चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST2021-03-26T04:31:26+5:302021-03-26T04:31:26+5:30

khed-photo252 मुंबई - गोवा महामार्गावर खेड येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्यानंतर कारच्या समाेरील भागाचा चक्काचूर झाला हाेता. ...

A car hitting a trailer parked on the highway; Four people were injured | महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक; चारजण जखमी

महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारची धडक; चारजण जखमी

khed-photo252

मुंबई - गोवा महामार्गावर खेड येथे उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्यानंतर कारच्या समाेरील भागाचा चक्काचूर झाला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : मुंबई - गोवा महामार्गावर कळंबणी येथे हॅप्पी पंजाबी धाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या स्वीफ्ट मोटारीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चारजण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता हा अपघात घडला. हॅप्पी पंजाबी ढाब्यातील कर्मचारी आणि महामार्गावरील प्रवाशांनी जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

खेड तालुक्यातील कळंबणी गावाच्या हद्दीत गुरुवारी (२५ रोजी) सकाळी ७.५५ वाजण्याच्या सुमारास ट्रेलर (जीजे १२, बीएक्स ३१०१) हा महामार्गाच्या डाव्या बाजूला हॅप्पी पंजाबी ढाबा येथे उभा होता. त्यावेळी मुंबईहून खेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्वीफ्ट मोटारीने (एमएच ०८, एएन ७६३८) या ट्रेलरला पाठीमागून जोरात ठोकर दिली. या अपघातात स्वीफ्ट चालक अहमद महम्मद परकार (५७, रा. शिव बुद्रुक ता. खेड) यांच्यासह मोटारीतून प्रवास करणारे जुमाना शब्बीर पालेकर (१५), अमीना शब्बीर पालेकर (११), सुरैय्या शब्बीर पालेकर (५०, सर्व रा. शिव बुद्रुक, ता. खेड) हे जखमी झाले. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: A car hitting a trailer parked on the highway; Four people were injured