चिपळूण: कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात अकलूजचे नायब तहसीलदार रविकिरण रामकृष्ण कदम हे गंभीर जखमी झाले. कदम यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. आज, सोमवारी (दि.७) दुपारी हा अपघात झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकलूजचे नायब तहसीलदार रविकिरण कदम हे कारमधून कराडहून चिपळूणकडे आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते. अवघड वळणावर त्यांची कार दरीत कोसळली. रविकिरण कदम यांनी प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, अपघातात कदम गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने कराड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कदम यांना उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून कुंभार्ली घाट धोकादायक बनत चालला आहे त्यातच काही दिवसापूर्वी एक भीषण अपघात घाटात झाला होता. त्यामध्ये माय लेकाला जीव गमवावा लागला होता.
रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी
By संदीप बांद्रे | Updated: April 7, 2025 19:08 IST